दौंड-वरवंड-प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील वरवंड गावात घडलेल्या एका थरारक खून प्रकरणाचा यवत पोलिसांनी अवघ्याकाही दिवसांत उलगडा केला आहे. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फूटेज तपासणी आणि गुप्तबातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून खुनाची कबुली मिळवलीआहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा पसरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्रीपासून ते ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७:४५वाजण्याच्या सुमारास, वरवंड गावाच्या हद्दीतील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला, मयुर सरनोतयांच्या मालकीच्या पडीक जमिनीत एक भीषण खून घडला. मृत व्यक्तीची ओळख शैलेंद्रकुमारसुशिलकुमार विमल (वय ३३, मूळ रहिवासी उत्तर प्रदेश, सध्या वखंड, वरसगाव येथे वास्तव्यास) अशीपटली.
अज्ञात आरोपीने कोणत्यातरी वैयक्तिक कारणावरून किंवा वैरातून, पीडिताच्या डोक्यावर सिमेंट वविटांचे मिश्रण असलेल्या जड तुटक्या ठोकळ्याने वार करून ठार मारले होते. मृतदेह निर्जन पडीकजमिनीत टाकण्यात आला होता, ज्यामुळे हा प्रकार गावभर चर्चेचा विषय ठरला.
घटनेनंतर यवत पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. सहाय्यक पोलीसनिरीक्षक प्रविण संपांगे आणि महेश माने यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने घटनास्थळी सखोलतपास केला. तपासादरम्यान तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फूटेज आणि मोबाईल लोकेशन विश्लेषणाचाआधार घेतला गेला.
या तपास प्रक्रियेत पोलिसांना काही संशयित व्यक्तींच्या हालचालींची माहिती मिळाली. त्याचबरोबरगोपनीय बातमीदारांकडूनही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. या सर्व माहितीचे पडताळणी केल्यानंतर, पोलिसांनी विनोद उर्फ नंदू दत्तात्रय रणधीर (रा. वरवंड, ता. दौंड) आणि गणेश उर्फ अक्षय तानाजी उमाटे(वय २८, मूळ रा. जि. धाराशिव, सध्या रा. कानिफनाथ नगर, वरवंड) यांना ताब्यात घेतले.
सुरुवातीला चौकशीदरम्यान आरोपींनी टाळाटाळ केली, मात्र पोलिसांच्या काटेकोर चौकशीत त्यांनीअखेर खुनाची कबुली दिली. आरोपींच्या मते, काही वैयक्तिक वादातून त्यांनी संगनमताने शैलेंद्रकुमारयांच्या डोक्यावर विटा आणि सिमेंटचे मिश्रण असलेला ठोकळा घालून त्यांचा खून केला. या विधानानंतरपोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली वस्तू जप्त केली.
ही संपूर्ण कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेशबिरादार (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस (दौंड विभाग) आणि स्थानिकगुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविणसंपांगे, महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भोसले व संजय जगदाळे, सहायक फौजदार महेंद्र फणसे, पोहवा गुरूनाथ गायकवाड, संदीप देवकर, अक्षय यादव, विकास कापरे, महेंद्र चांदणे, राम जगताप, दत्तात्रय काळे, प्रमोद गायकवाड तसेच पोहवा हिरालाल खोमणे, मुटेकर, पानसरे, विनायक हाके, पोकॉ भारत भोसले, मारूती बाराते, प्रतिक गरूड, मोहन भानवसे, प्रणव ननवरेआणि स्थानिक गुन्हे शाखेचे अजित भुजबळ, पोहवा योगेश नागरगोजे, राजु मोमीन यांचा समावेश होता.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. शेख हे करतअसून, आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासादरम्यान खुनाचे नेमके कारण, आरोपींच्या हालचाली आणि त्यांच्यातील संबंध यांचा तपास सुरू आहे. पोलिसांचा विश्वास आहे की याचौकशीतून आणखी काही महत्त्वाचे तपशील उघड होऊ शकतात.

0 Comments